Aurangabad news  
मराठवाडा

बेपत्ता पत्नीच्या शोधासाठी टाहो : पोलिसांना लागेना पत्ता

सुशेन जाधव

औरंगाबाद : एका खासगी सुरक्षारक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाली. या प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली असता, न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी तपासाबाबत काय पावले उचलली अशी विचारणा करत 13 डिसेंबरपर्यंत अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले.

उस्मानपुऱ्यातील ऍक्‍सिस बॅंकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या रामराव मारुती घुले (रा. मूळ परभणी जिल्हा. ह. मु. उस्मानपुरा) याची पत्नी अश्‍विनी घुले ही जुलै महिन्यात 10 महिन्यांच्या बाळाला घेऊन राहत्या घरून बेपत्ता झाली. रामराव याने 17 जुलै 2019 रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

17 जुलैपासून अद्यापपर्यंत फिर्यादी पतीने संबंधित पोलिस ठाण्यात पत्नीच्या तपासासंदर्भात चौकशी केली. मात्र, पत्नीचा तपास न लागल्याने पती रामराव घुले याने ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यातर्फे औरंगाबाद खंडपीठात हेबियस कार्पस याचिका दाखल केली.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने औरंगाबाद पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक, महाराष्ट्र शासन यांना संबंधित सुरक्षारक्षक पतीने तक्रार दाखल झाल्यापासून बेपत्ता पत्नीचा शोध घेतला का? तपासाबाबत नेमकी कोणती पावले उचलली याविषयीचा अहवाल खंडपीठात 13 डिसेंबरपर्यंत सादर करावा असे आदेश दिले. प्रकरणात पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजी होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT